Aashwani Kumar
Aashwani Kumar 
देश

CBIचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या; सापडली सुसाइड नोट

सकाळ ऑनलाईन टीम

शिमला: माजी राज्यपाल आणि CBI चे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. कुमार यांनी शिमल्यातील स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दलची माहिती शिमलाच्या एसपी मोहित चावला यांनी देऊन ही खूपच धक्कादायक बाब असल्याचे सांगितले. चावला यांनी सांगितले की पोलीस आधिकाऱ्यांसाठी अश्वनी कुमार हे एक आदर्श होते. शिमल्यातील ब्रॅक फास्टमधील घरात कुमार यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही मिळाली आहे. त्यात जिवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहलेले आहे.

अश्वनी कुमार (Ashwini Kumar) हे 70 वर्षाचे होते. यापुर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशात पोलीस मंहासंचालक म्हणूनही काम केले होते. सुत्रांच्या माहितीनुसार कुमार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. पण याबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी कुमार यांच्या आत्महत्येचं कारण समजलं नसल्याचे सांगितले आहे. आत्महत्या झालेल्या ठिकाणावरून पोलीसांनी एक सुसाइड नोटही जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पोस्टमार्टमचे रिपोर्ट आल्यानंतरच या आत्महत्या प्रकरणाचा सविस्तर उलघडा होईल, अशी माहिती पोलीसांनी दिली.

हे वाचा - रेल्वेने आरक्षणासंबंधी बदलले नियम; जाणून घ्या माहिती
                          
अमित शहांना अटक केले होते-
मार्च 2013 ते जून 2014 काळात अश्वनी कुमार यांनी नागालॅंड आणि मनिपुरचे राज्यपालपदही भूषविले होते. त्याअगोदर 2006 ते 2008 दरम्यान कुमार हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. तसेच 2008- 2010 दरम्यान त्यांनी CBI चे संचालक म्हणून काम करताना सोहराबुद्दीन शेखच्या बनावट एनकाउंटर प्रकरणात अमित शहा यांना अटक केले होती.   

1985 साली शिमल्याचे एसपी असताना कुमार यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये( SPG) नेमणूक केली होती.  1985- 1990 दरम्यान कुमार यांनी एसपीजीच्या अनेक पदांवर काम केले होते. यासोबतच कुमार यांनी PMOमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी देशाच्या गुप्तचर संस्थेतही आपल्या सेवेचं योगदान दिले आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT